निवडक सुभाषिते · Wit & Riddles
एकोणीस गेल्या, वीस परतल्या
एकोना विंशतिः स्त्रीणां स्नानार्थं शरयूं गताः । विंशतिः पुनरायाता एको व्याघ्रेण भक्षितः ॥
कोडे: ‘एकोणीस स्त्रिया शरयूवर स्नानाला गेल्या. वीस परत आल्या आणि एकाला वाघाने खाल्ले.’ कसे? ‘एकोना विंशतिः’ म्हणजे एकोणीस; पण ‘एको ना, विंशतिः’ असे फोडले की अर्थ होतो ‘एक पुरुष आणि वीस स्त्रिया’. वीस स्त्रिया परतल्या, आणि त्या पुरुषाला वाघाने खाल्ले.