निवडक सुभाषिते · Wit & Riddles
बादरायण संबंध
अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः । बादरायणसम्बन्धात् यूयं यूयं वयं वयम् ॥
‘आमच्या गाडीचे चाक बोरीच्या लाकडाचे आणि तुमच्या अंगणात बोरीचे झाड. म्हणजे बोरीच्या (बदरी) नात्याने आपण नातेवाईकच.’ यालाच ‘बादरायण संबंध’ म्हणतात—स्वार्थासाठी ओढूनताणून जोडलेले नाते.