निवडक सुभाषिते · Wit & Riddles
शंकराने विष का प्यायले
अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्तः फणी तं च क्रौञ्चपतेः शिखी च गिरिजासिंहोऽपि नागाननम् । गौरी जह्नुसुतामसूयति कलानाथं कपालानलो निर्विण्णः स पपौ कुटुम्बकलहादीशोऽपि हालाहलम् ॥
शंकराचा भुकेला साप गणपतीच्या उंदराला खाऊ पाहतो, कार्तिकेयाचा मोर त्या सापाला, आणि पार्वतीचा सिंह गजमुख गणपतीला. पार्वती शंकराच्या जटेतल्या गंगेचा मत्सर करते आणि कपाळावरचा अग्नी चंद्राचा. या घरगुती भांडणांना कंटाळून खुद्द शंकरानेही विष प्यायले.