निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
गंगाही धनिकाकडेच
न विद्यया नैव कुलेन गौरवं जनानुरागो धनिकेषु सर्वदा । कपालिना मौलिधृतापि जाह्नवी प्रयाति रत्नाकरमेव सत्वरम् ॥
विद्येने मान मिळत नाही, कुळानेही नाही; लोकांचे प्रेम नेहमी श्रीमंतांवरच असते. कवटी बाळगणाऱ्या अकिंचन शंकराने गंगेला मस्तकावर धारण केले, तरी ती रत्नांचे भांडार असलेल्या समुद्राकडे वेगाने धाव घेते.