निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
अप्रकटीकृतशक्तिः शक्तोऽपि जनस्तिरस्क्रियां लभते । निवसन्नन्तर्दारुणि लङ्घ्यो वह्निर्न तु ज्वलितः ॥
समर्थ असूनही जो आपली शक्ती दाखवत नाही, त्याची अवहेलना होते. लाकडात दडलेल्या अग्नीवरून कोणीही ओलांडून जातो; पेटलेल्या अग्नीवरून मात्र कोणी जात नाही.