निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
भुकेची क्रूरता
त्यजेत् क्षुधार्ता जननी स्वपुत्रं खादेत् क्षुधार्ता भुजगी स्वमण्डम् । बुभुक्षितः किं न करोति पापं क्षीणा जना निष्करुणा भवन्ति ॥
भुकेने व्याकूळ आई आपल्या मुलालाही टाकून देते, भुकेली नागीण स्वतःचीच अंडी खाते. भुकेला माणूस कोणते पाप करणार नाही? उपासमारीने खंगलेली माणसे निर्दय होतात.