निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
आपले काम पाहावे
पराधिकारचर्चां यः कुर्यात् स्वामिहितेच्छया । स विषीदति चीत्कारात् गर्दभस्ताडितो यथा ॥
धन्याच्या हितासाठी का होईना, जो दुसऱ्याच्या कामात लुडबुड करतो, तो दुःखी होतो. कथेतल्या गाढवाचे असेच झाले: घराची राखण हे कुत्र्याचे काम होते, पण चोर पाहून गाढव ओरडले आणि उलट मार खाऊन बसले.