निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
धनच खरा नातेवाईक
त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं पुत्राश्च दाराश्च सुहृज्जनाश्च । तमर्थवन्तं पुनराश्रयन्ति अर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः ॥
धन गेले की मित्र, मुलगे, पत्नी आणि हितचिंतकही माणसाला सोडून जातात; तो पुन्हा धनवान झाला की सगळे परत त्याच्याकडे येतात. या जगात पैसा हाच माणसाचा खरा नातेवाईक.