निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
अविवाहित स्तुतिकन्या
अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति नाम कौमारम् । सद्भ्यो न रोचते सा असन्तः अपि अस्यै न रोचन्ते ॥
स्तुती ही जणू एक कन्या; तिचे कौमार्य आजही सुटत नाही. सज्जनांना ती आवडत नाही, कारण त्यांना आपली स्तुती आवडत नाही; आणि दुर्जन तिला आवडत नाहीत, कारण त्यांच्यात स्तुती करण्याजोगे काही नसते.