निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानप्रेमाची सहा लक्षणेददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति । भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम् ॥देणे आणि घेणे, आपले गुपित सांगणे आणि त्याचे गुपित विचारणे, त्याच्याकडे जेवणे आणि त्याला जेवू घालणे—ही प्रेमाची सहा लक्षणे आहेत.