निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
कमळात अडकलेला भुंगा
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्रीः । इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ॥
“रात्र सरेल, सुंदर पहाट होईल, सूर्य उगवेल आणि कमळ पुन्हा उमलेल.” मिटलेल्या कमळात अडकलेला भुंगा असा विचार करत होता. तेवढ्यात, हाय, एका हत्तीने ती कमळवेलच उपटून टाकली.