निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
दारिद्र्याचा दोष
एको हि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोरिति यो बभाषे । नूनं न दृष्टं कविनापि तेन दारिद्र्यदोषो गुणराशिनाशी ॥
गुणांच्या समूहात एखादा दोष बुडून जातो, जसा चंद्राच्या किरणांत त्याचा डाग, असे एका कवीने म्हटले. त्याच्या लक्षात दारिद्र्य आलेच नसावे; हा एकच दोष गुणांच्या राशीचा नाश करतो.