निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
वन आणि वाघ
मा वनं छिन्धि सव्याघ्रं मा व्याघ्राः नीनशन् वनात् । वनं हि रक्ष्यते व्याघ्रैः व्याघ्रान् रक्षति काननम् ॥
वाघांसकट जंगल तोडू नका, आणि वाघांना जंगलातून हुसकून लावू नका. जंगल वाघांना आसरा देते, आणि वाघ जंगलाचे रक्षण करतात, कारण वाघ असलेल्या रानात कुऱ्हाड चालवायला कोणी धजत नाही.