स्वायत्तमेकान्तहितं विधात्रा विनिर्मितं छादनमज्ञतायाः । विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनमपण्डितानाम् ॥
विधात्याने अज्ञान झाकण्यासाठी असे एक आवरण निर्माण केले आहे, जे स्वतःच्या ताब्यात आहे आणि नेहमी हितकारक आहे—मौन. विशेषतः विद्वानांच्या सभेत मौन हेच अडाण्यांचे भूषण.