प्रमुख उपनिषदे · ऐतरेयोपनिषद्
ऐकण्याने नाही
तच्छ्रोत्रेणाजिघृक्षत् तन्नाशक्नोच्छ्रोत्रेण ग्रहीतुम् । स यद्धैनच्छ्रोत्रेणाग्रहैष्यच्छ्रुत्वा हैवान्नमत्रप्स्यत् ॥ ६ ॥
त्याने श्रवणाने ते पकडू पाहिले, पण श्रवणाला ते धरता आले नाही. ते धरता आले असते, तर नुसते अन्नाबद्दल ऐकल्यानेच पोट भरले असते. लग्नातल्या पंगतीचे वर्णन कितीही रंगवून ऐकले, तरी त्यावर कुणी तृप्त होऊन झोपत नाही.