प्रमुख उपनिषदे · ऐतरेयोपनिषद्
पाहण्याने नाही
तच्चक्षुषाऽजिघृक्षत् तन्नाशक्नोच्चक्षुषा ग्रहीतुम् । स यद्धैनच्चक्षुषाऽग्रहैष्यद्दृष्ट्वा हैवान्नमत्रप्स्यत् ॥ ५ ॥
त्याने दृष्टीने ते पकडू पाहिले, पण दृष्टीला ते धरता आले नाही. ते धरता आले असते, तर नुसते अन्नाकडे पाहिल्यानेच पोट भरले असते. मिठाईच्या दुकानाच्या काचेपाशी उभ्या मुलाला हे चांगले ठाऊक असते. पाहून भूक उलट वाढतेच.