प्रमुख उपनिषदे · छान्दोग्योपनिषद्
आधी प्रयत्न
यदा वै करोत्यथ निस्तिष्ठति नाकृत्वा निस्तिष्ठति कृत्वैव निस्तिष्ठति कृतिस्त्वेव विजिज्ञासितव्येति कृतिं भगवो विजिज्ञास इति ॥ १ ॥
निष्ठा कृतीवर, म्हणजे प्रयत्नावर, उभी असते. “माणूस कृती करतो, तेव्हाच तो निष्ठावान होतो. कृती न करता कुणी निष्ठावान होत नाही; कृती करणाराच निष्ठावान होतो. पण कृतीच आधी जाणून घ्यायला हवी.” “भगवन्, मला कृती जाणून घ्यायची आहे.” कृती म्हणजे नुसते करणे. शंकराचार्यांच्या मते इथे महत्त्वाची कृती म्हणजे इंद्रियांना आवर घालणे आणि मन एकाग्र करणे.