प्रमुख उपनिषदे · केनोपनिषद्
वाऱ्याची बढाई
तस्मिंस्त्वयि किं वीर्यमित्यपीदं सर्वमाददीय यदिदं पृथिव्यामिति ॥ ९॥
“मग तुझ्यात सामर्थ्य तरी काय आहे?” “जे जे आहे ते सारे मी उडवून नेऊ शकतो,” वायू म्हणाला, “या पृथ्वीवरचे सारे काही.” मोठे वादळ घरांची छपरे उडवून लावते, जहाजे भिरकावून देते. हे सारे करून दाखवलेल्याच्या थाटात वायू बोलत होता.