संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
हातात माळ, मन भलतीकडे
माला तो कर में फिरै, जीभि फिरै मुख माँहि। मनुवाँ तो दहुँ दिसि फिरै, यह तौ सुमिरन नाहिं॥
हातात माळ फिरत असते, आणि तोंडात जीभ फिरत देवाचे नाव घेत असते. मन मात्र दाही दिशांना भटकत असते. कबीर म्हणतात, याला स्मरण म्हणत नाहीत. नामजपाचा हेतूच देवाला सतत मनात ठेवणे; म्हणून या साधनेत सगळ्यांत जास्त गरज मनाची असते. या चित्रात तीन गोष्टी फिरतात, आणि जी खरी महत्त्वाची, तीच पळून गेली आहे.