जाति न पूछो साध की, पूछ लीजिए ज्ञान।
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान॥
साधूची जात विचारू नका; विचारायचेच तर त्याचे ज्ञान विचारा. किंमत करा ती तलवारीची, आणि म्यान जिथे पडले आहे तिथेच पडू द्या.
जात म्हणजे म्यान, आणि ज्ञान म्हणजे खरे पाते. तलवार घेणारा पैसे पात्याचे मोजतो, म्यानाचे नव्हे; तसेच साधूकडे जाणाऱ्याने त्याचे ज्ञान पारखावे.