संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
मीपणाचे मडके फोडून टाक
संसकिरत भाषा पढ़ि लीन्हा ज्ञानी लोग कहो री आसा-तृष्णा में बही गयो सजनी काम के ताप सहो री मान-मनी की मटुकी सिर पर नाहक बोझ मरो री मटुकी पटक मिलो पीतम से साहेब कबीर कहो री॥
सखे, तू संस्कृत शिकलीस, आणि लोक तुला ज्ञानी म्हणतात. तरीही आशा आणि तृष्णा यांच्या लोंढ्यात तू वाहून गेलीस, आणि वासनेचा दाह सोसते आहेस. गावातली बाई पाण्याचे मातीचे मडके डोक्यावरून नेते, तसे तू मानाचे आणि मीपणाचे मडके डोक्यावर घेऊन फिरतेस. ज्याची काहीच गरज नव्हती, अशा ओझ्याखाली तू मरते आहेस. ते मडके आपटून फोड आणि आपल्या प्रियकराला, देवाला, जाऊन भेट; त्याला आपला स्वामी म्हण, असे कबीर सांगतात.