पोथी पढ़-पढ़ जग मुआ, पंडित भया न कोय।
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय॥
पोथ्या वाचता वाचता सारे जग मरून गेले, पण खरा पंडित कोणीच झाला नाही. प्रेमाची अडीच अक्षरे जो वाचतो, तोच खरा पंडित होतो.
‘प्रेम’ हा शब्द लिहायला अडीचच अक्षरे लागतात, कारण त्यातला ‘प’ अर्धा असून ‘र’ला जोडलेला असतो. आजवर वाचलेल्या सगळ्या पोथ्यांपुढे कबीर हा एवढासा एक शब्द ठेवतात.