बेह्या दीन्हों खेत को, बेह्या खेतहिं खाय।
तीन लोक संशय परी, मैं काहि कहौं समुझाय॥
शेताची राखण व्हावी म्हणून त्याभोवती कुंपण घातले, आणि आता तेच कुंपण शेत खाऊ लागले आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, तिन्ही लोक संशयात पडले आहेत. अशा वेळी मी समजावू तरी कोणाला, असे कबीर विचारतात.
पिकाच्या रक्षणासाठी जे उभे केले, तेच पीक फस्त करू लागले आहे.