तन कौ जोगी सब करैं, मन कौ बिरला कोइ।
सब बिधि सहजैं पाइए, जे मन जोगी होइ॥
देहाने योगी सगळेच होतात; मनाने योगी होणारा विरळाच. मन योगी झाले, तर सगळे काही सहज, आपोआप मिळते.
देहाचा योग इतरांना दिसतो; मनाच्या योगाच्या वाटेला फार थोडे जण जातात. पण बाकी सगळे काही मनाच्या योगाबरोबरच येते.