संत कबीर · प्रेम आणि विरह
बाहूंच्या खांबांचा झोका
कोई प्रेम की पींग झुलाओ रे भुज के खंभ और प्रेम के रस से, तन मन आज झुलाओ रे नैनन बादर की झर लाओ, श्याम घटा उर छाओ रे आवत आवत श्रवण की राह पर, फिकर पिया को सुनावो रे कहत कबीर सुनो भाई साधो, पिया को ध्यान चित लावो रे
कोणी प्रेमाचा झोका झुलवा रे! श्रावणात बायका झाडांना झोके बांधतात, आणि गाणी म्हणत झुलतात; तसाच हा झोका. त्याचे दोन खांब म्हणजे बाहू, प्रियाचे बाहू; आणि प्रेमाच्या गोडव्याने आज तन आणि मन झुलवा. डोळ्यांत ढगांची झड आणा, विरहाच्या अश्रूंची; आणि हृदयावर काळ्या मेघांची दाटी होऊ द्या. जवळ, आणखी जवळ या, अगदी त्याच्या कानापर्यंत; आणि प्रियाला, म्हणजे देवाला, आपल्या जिवाची सारी घालमेल सांगा. साधू भावा, ऐक, असे कबीर म्हणतात: प्रियाचे ध्यान चित्तात लाव, आणि त्याला तिथेच धरून ठेव.