संत कबीर · प्रेम आणि विरह
तलावही पेटला
बिरह जलाई मैं जलौं, जलती जलहर जाऊँ। मो देख्याँ जलहर जलै, संतौ कहाँ बुझाऊँ॥
देवाच्या विरहाने मला जाळले आहे, मी जळते आहे, असे प्रियकरापासून दूर असलेली एक स्त्री संतांना सांगते. जळत जळत मी तलावाकडे जाते, जरा गारवा मिळावा म्हणून; पण मला पाहताच तलावच पेटून उठतो. संतांनो, सांगा, ही आग मी कुठे विझवू? आगीवर पाणी हा हमखास उपाय. पण देवापासून दूर राहिलेल्या जिवाची ही तळमळ अशी भयंकर आग आहे, की ती उलट पाण्यालाच पेटवते.