संत कबीर · प्रेम आणि विरह
उघडली आभाळाची दारे
निस दिन सालै घाव, नींद आवे नहीं पिया मिलन की आस, नैहर भावे नहीं खुल गए गगन किवाड़, मंदिर उजियार भयो भयो है पुरुष से भेंट, तन मन वार दियो
रात्रंदिवस एक जखम ठसठसते, आणि झोप लागत नाही. हे बोलणारी तरुण बायको नवऱ्याच्या भेटीची आस लावून बसली आहे. अजून ती माहेरीच आहे, त्याच्यापासून दूर; आणि आता ते माहेर तिला गोड लागत नाही. तिचा धनी म्हणजे ईश्वर, आणि ती जखम म्हणजे त्याच्यासाठी लागलेली ओढ. मग आभाळाची दारे उघडतात. हे आभाळ आतले आहे: योगी गाढ ध्यानात पोचतात ती निश्चल शांतता. देऊळ उजेडाने भरून जाते. तिला पुरुष भेटला आहे, म्हणजे परमपुरुष; तो परमेश्वरच तिचा खरा नवरा. आपले तन आणि मन ती त्याला अर्पण करते.