संत कबीर · प्रेम आणि विरह
पैलतीराला पोचणारे थोडेच
जिस से रहनी अपार जगत में, सो प्रीतम मुझे प्यारा हो जैसे पुरइनि रही जल भीतर, जलहि में करत पसारा हो वाके पानी पत्र न लागे, ढलकि चले जस पारा हो जैसे सती चढ़े अगिन पर, प्रेम-वचन न टारा हो आप जरे औरन को जारे, राखे प्रेम-मरजादा हो भवसागर इक नदी अगम है, अहद अगाध धारा हो कहें कबीर सुनो भाई साधो, बिरले उतरे पारा हो
ज्याच्यामुळे मी जगात राहूनही जगाच्या पलीकडे राहतो, तो प्रियतम प्रभू म्हणजे माझा जीव की प्राण. हे प्रेम कसे असते, ते कबीर दोन चित्रांतून दाखवतात. पहिले चित्र कमळाचे. ते पाण्यातच राहते, आणि पाण्यावरच पसरते; तरी त्याच्या पानाला पाणी चिकटत नाही. थेंब पाऱ्याच्या मण्यांसारखे घरंगळून जातात. दुसरे चित्र सतीचे, म्हणजे नवऱ्याच्या चितेवर चढलेल्या स्त्रीचे; प्रेमात दिलेला शब्द ती मागे घेत नाही. ती स्वतः जळते, आणि तिची आग इतरांनाही पेटवते; तरी प्रेमाची मर्यादा ती पुरेपूर राखते. हा संसारसागर म्हणजे जिला कुठेच उतार नाही अशी एक प्रचंड नदी आहे; तिच्या प्रवाहाला अंत नाही, आणि तळही नाही. कबीर साधूबंधूला सांगतात: पैलतीराला एखादाच विरळा पोचतो.