संत कबीर · मन, अहंकार आणि माया
मनाचे लाख दरवाजे
ई मन चंचल ई मन चोर, ई मन शुद्ध ठगहार। मन-मन करते सुर-नर मुनि जहँड़े, मन के लक्ष दुवार॥
हे मन चंचल आहे. हे मन चोर आहे, अट्टल ठग आहे. मनाशी झुंजता झुंजता देव, माणसे आणि मुनी सगळेच फसले, भरकटले. कारण मनाला लाख दारे आहेत. लाख दारांवर कोणी पहारा बसवू शकत नाही. म्हणूनच देव आणि मुनीसुद्धा गाफील सापडले.