संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
सिंहांचे कळप नसतात
हीरों की ओबरी नहीं, मलयागिरि नहिं पाँत। सिंहों के लेहँड़ा नहीं, साधु न चले जमात॥
हिरे खोल्या भरभरून ठेवलेले नसतात. दक्षिणेतल्या मलयगिरीवर चंदनाची झाडे रांगेने उभी नसतात. सिंह कळप करून फिरत नाहीत. आणि खरे साधू जथा करून चालत नाहीत. त्या काळी पुष्कळ साधू मोठमोठ्या जथ्यांनी फिरत. कबीर खऱ्या साधूला हिरा, चंदन आणि सिंह यांच्या पंक्तीला बसवतात. हे सगळे दुर्मीळ असतात, आणि एकेकटेच सापडतात.