साँचे कोइ न पतीजई, झूठे जग पतियाय।
गली गली गोरस फिरै, मदिरा बैठि बिकाय॥
खऱ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, आणि खोट्यावर सारे जग विश्वास ठेवते. दूधदही गल्लोगल्ली फिरून विकावे लागते, आणि दारू मात्र दुकानात बसल्या जागी खपते.
इथे सत्य म्हणजे दूध, आणि खोटे म्हणजे दारू. एकाला गिऱ्हाईक शोधत फिरावे लागते; दुसऱ्याकडे गिऱ्हाईक आपणहून येते.