संत कबीर · सद्गुरू आणि शब्द
उशाशी उभा स्वामी
परमातम गुरु निकट बिराजे जाग जाग मन मेरे धाय के पीतम चरनन लागै साईं खड़ा सिर तेरे जुगन जुगन तोहि सोवत बीता अजहू न जाग सबेरे
तुझा गुरू साक्षात परमात्मा आहे, आणि तो तुझ्या अगदी जवळ बसला आहे. ऊठ, माझ्या मना, जाग! धाव घे आणि त्या प्रियतमाच्या पायांवर लोटांगण घाल. तू झोपेत आहेस, आणि तो स्वामी तुझ्या उशाशी उभा आहे. युगामागून युगे तू झोपेतच घालवलीस. सकाळ झाली आहे; आता तरी जागणार नाहीस का?