मनाचे श्लोक
कल्पवृक्षाखाली दुःख
उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरी सर्वदा तें चि आहे। जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा। पुढें मागुता शोक जीवीं धरावा॥
तो कल्पवृक्षाखाली उभा आहे, आणि तरीही दुःखाचे ओझे वाहतो; त्याच्या अंतरात सदा तेच, फक्त दुःखच असते. सामान्य लोकांत असो की सज्जनांत, तो वाद वाढवतच राहतो. आणि मग पुन्हा तोच शोक जिवाशी धरून बसतो. हा वृक्ष म्हणजे राम; मागच्या श्लोकात तेच सांगितले होते. आणि हा माणूस नेमका त्याच्याखाली उभा आहे. वृक्ष मागितलेले देतो, पण हा त्याच्यापुढे स्वतःचे दुःखच घेऊन येतो. सज्जनांशीसुद्धा भांडण्यात तो वेळ घालवतो; आणि भांडण संपले तरी दुःख त्याच्यापाशीच राहते.