मनाचे श्लोक
मीपणाला न दिसणारा देव
तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा। कळेना कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जगीं मीपणासी॥
तो देवांचा राजा कधी तुटत नाही, फुटत नाही. तो कधी चळत नाही, ढळत नाही; कशानेही दैन्यवाणा होत नाही. कोणत्याही डोळ्यांना, कोणत्याही प्रकारे, तो कधीच कळत नाही. आणि या जगात तो मीपणाबरोबर राहत नाही, मीपणाला दिसतही नाही. शेवटच्या ओळीतला शब्द मीपण: ‘मी’ आणि ‘माझे’ ही भावना, म्हणजेच अहंकार.