मनाचे श्लोक
प्रत्येकाला वाटते, मी चिरंजीव
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी । चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥
हे मना, नीट पाहिले तर हे जग खरोखर मृत्यूची भूमी आहे. तरीही जिवंत असेपर्यंत सगळे जीव ‘मी, मी’ करतात. प्रत्येकाला वाटते, आपण चिरंजीव आहोत. आणि मग अचानक, काही कळायच्या आत, सगळे सोडून निघून जातात. वडीलधारी माणसे आजही लहानांना ‘चिरंजीव हो’ असा आशीर्वाद देतात. या श्लोकातली माणसे जणू तो आशीर्वाद आधीच खरा ठरला आहे, अशा थाटात जगतात.