मनाचे श्लोक
रामाचे ब्रीद गाजते
पदीं राघवाचें सदा ब्रीद गाजे । बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे । पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
राघवाच्या पायात त्याचे ब्रीद सदैव गाजत असते. भक्तांच्या शत्रूंच्या डोक्यावर त्याची काठी जोराने आदळते. पृथ्वी सोडून जाताना त्याने आपली सारी नगरी विमानांत बसवून बरोबर वर नेली. आपल्या लाडक्या दासांना राम कधीच अंतर देत नाही. पूर्वीचे वीर आपले ब्रीद, म्हणजे आपली प्रतिज्ञा किंवा अभिमानाचे बिरुद, पायातल्या तोडरावर धारण करत; चालताना ते वाजत असे. शरण आलेल्याचे रक्षण करणे, हे रामाचे ब्रीद. ती नगरी म्हणजे त्याची राजधानी अयोध्या: रामायणाच्या शेवटी तिथले लोक त्याच्याबरोबर स्वर्गाला गेले.