मनाचे श्लोक
सुखाची घडी सरण्याआधी
मना वीट मानूं नको बोलण्याचा । पुढें मागुता राम जोडेल कैंचा । सुखाची घडी लोटतां सूख आहे । पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥
हे मना, या बोलण्याचा वीट मानू नकोस. आता हे सोडलेस, तर पुढे राम कसा जोडशील? सुखाची घडी असेपर्यंतच सुख असते. तिच्यानंतर सगळे जाईल, काहीच उरणार नाही. वीट म्हणजे एखादी गोष्ट फार झाल्यावर येणारा कंटाळा, रोज रोज ताटात येणाऱ्या एकाच पदार्थासारखा. लग्नाची पंगत चालू असते तोवर आनंद असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणे निघून गेलेले असतात, आणि मांडव उतरवला जात असतो.