निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
अधोर्ध पाहातां चहुंकडे · दासबोध २०.२.६-७
अधोर्ध पाहातां चहुंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे । मन धांवेल कोणेकडे । अंत पाहावया ॥ ६ ॥ दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना । दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥ ७ ॥
दृश्य येते आणि जाते, पण आकाश जसे चहूकडे भरलेले असते, तसे ब्रह्म भरून राहिलेले असते, असे समर्थ याच्या आधी सांगतात. विवेकाने दृश्य बाजूला काढले की परब्रह्मच कोंदाटलेले उरते. समर्थ म्हणतात, खाली, वर, चहूकडे पाहिले, तर जिकडे तिकडे निर्गुण ब्रह्मच आहे. मग त्याचा अंत पाहायला मन कोणीकडे धावणार? दृश्य चळते, ब्रह्म चळत नाही. दृश्य कळते, ब्रह्म कळत नाही. दृश्य कल्पनेच्या पकडीत येते, ब्रह्म कल्पनेला आकळत नाही.