परम मूर्खामाजी मूर्ख । जो संसारीं मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणीक नाहीं ॥ ४० ॥
पढतमूर्खाच्या, म्हणजे खूप शिकूनही मूर्ख राहिलेल्या माणसाच्या लक्षणांचा हा समास. ती लक्षणे सांगून झाल्यावर समर्थ शेवटी हा निर्णय देतात.
जो संसारात सुख मानतो, तो परम मूर्खांमधलाही मूर्ख. कारण या संसारदुःखासारखे दुसरे दुःख नाही, असे समर्थ म्हणतात.
पुढच्या ओवीत ते सांगतात की यानंतर जन्माच्या दुःखाचे निरूपण येईल, आणि दारुण गर्भवासाचे वर्णन.