शरदि न वर्षति गर्जति वर्षति वर्षासु निःस्वनो मेघः । नीचो वदति न कुरुते न वदति सुजनः करोत्येव ॥
शरद ऋतूत ढग गडगडतात पण बरसत नाहीत, तर पावसाळ्यात न गडगडता शांतपणे बरसतात. त्याचप्रमाणे हलका माणूस खूप बोलतो पण काहीच करत नाही, तर सज्जन न बोलताच आपले काम करून दाखवतो.