साक्षराः विपरीताश्चेद्राक्षसाः एव केवलम् । सरसो विपरीतश्चेत्सरसत्वम् न मुञ्चति ॥
‘साक्षर’ हा शब्द उलटा वाचला तर ‘राक्षस’ होतो: बिघडलेला शिकलेला माणूस राक्षसच ठरतो. पण ‘सरस’ म्हणजे रसिक, प्रेमळ मनाचा; हा शब्द उलटा वाचला तरी ‘सरस’च राहतो: खरा प्रेमळ माणूस परिस्थिती कशीही उलटली तरी आपला गोडवा सोडत नाही.