निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
चंदनाचा परोपकार
मूलं भुजंगैः शिखरं विहंगैः शाखाः प्लवङ्गैः कुसुमानि भृंगैः । आश्चर्यमेतत् खलु चन्दनस्य परोपकाराय सतां विभूतयः ॥
मुळांशी साप, शेंड्यावर पक्षी, फांद्यांवर माकडे आणि फुलांवर भुंगे: हेच चंदनाचे नवल, की त्याचा प्रत्येक भाग कोणाच्या ना कोणाच्या उपयोगी पडतो. तसेच सज्जनांचे सारे वैभव परोपकारासाठीच असते.