अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे । इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजम् ॥
‘माझे अन्न, माझे वस्त्र, माझी पत्नी, माझे नातेवाईक’ असे ‘मे-मे’ करत राहणाऱ्या माणसाला कालरूपी लांडगा बोकडासारखा उचलून नेतो. संस्कृतमध्ये ‘मे’ म्हणजे ‘माझे’, आणि बोकडाचे ओरडणेही ‘मे-मे’ असेच असते.