निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
समाधान हीच खरी संपत्ती
वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः सम इह परितोषो निर्विशेषो विशेषः । स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ॥
वल्कले नेसलेला एक वनवासी एका श्रीमंताला म्हणतो: आम्ही इथे वल्कलांत समाधानी आहोत, तुम्ही रेशमी वस्त्रांत. आपले समाधान सारखेच; त्यात फरक असा काही नाही. ज्याची तृष्णा अमर्याद, तोच खरा गरीब. मन तृप्त असेल तर कोण श्रीमंत आणि कोण गरीब?