अहो किमपि चित्राणि चरित्राणि महात्मनाम् । लक्ष्मीस्तृणाय मन्यन्ते तद्भरेण नमन्त्यपि ॥
महात्म्यांचे वागणे किती विलक्षण असते. ते संपत्तीला गवताच्या काडीइतकीही किंमत देत नाहीत, आणि तरीही तिच्या भाराने वाकतात. गवताला वजन कुठे असते? त्यांना वाकवते ती नम्रता; धनाने ते गर्विष्ठ नव्हे, अधिक नम्र होतात.