निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
तलवारीच्या धारेवरचे व्रत
प्रदानं प्रच्छन्नं गृहमुपगते सम्भ्रमविधिः प्रियं कृत्वा मौनं सदसि कथनं चाप्युपकृते । अनुत्सेको लक्ष्म्यामनभिभवगन्धाः परकथाः सतां केनोद्दिष्टं विषममसिधाराव्रतमिदम् ॥
गुप्तपणे दान देणे, घरी आलेल्याचे तत्परतेने स्वागत करणे, उपकार करून गप्प राहणे पण आपल्यावर झालेला उपकार सभेत सांगणे, संपत्तीत गर्व नसणे आणि इतरांविषयी बोलताना निंदेचा लवलेश नसणे—सज्जनांना तलवारीच्या धारेसारखे हे कठीण व्रत कोणी शिकवले?