वातोल्लासितकल्लोल धिक् ते सागरगर्जनम् । यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकाम् ॥
वाऱ्याने लाटा उसळवणाऱ्या हे सागरा, तुझ्या गर्जनेचा धिक्कार असो. तुझ्याच काठावर तहानलेला वाटसरू विहीर कुठे आहे ते विचारतो, कारण तुझे पाणी खारट. जे मोठेपण कोणाच्या उपयोगी पडत नाही, त्याचा काय अभिमान?