निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
आशेचा अंत कोणी गाठला
निःस्वो वष्टि शतं शती दशशतं लक्षं सहस्राधिपो लक्षेशः क्षितिपालतां क्षितिपतिश्चक्रेशतां वाञ्छति । चक्रेशः पुनरिन्द्रतां सुरपतिर्ब्राह्मं पदं वाञ्छति ब्रह्मा शैवपदं शिवो हरिपदं चाशावधिं को गतः ॥
निर्धनाला शंभर हवेत, शंभरवाल्याला हजार, आणि हजारवाल्याला लाख. लखपतीला राजा व्हायचे असते, राजाला चक्रवर्ती, चक्रवर्तीला देवांचा राजा इंद्र, इंद्राला ब्रह्मदेवाचे पद, ब्रह्मदेवाला शंकराचे आणि शंकराला विष्णूचे. आशेच्या टोकापर्यंत कोण पोहोचला आहे?