निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्न
कधी न बिघडणारा रस
नायं प्रयाति विकृतिं विरसो न यः स्यात् न क्षीयते बहुजनैर्नितरां निपीतः । जाड्यं निहन्ति रुचिमेति करोति तृप्तिं नूनं सुभाषितरसोऽन्यरसातिशायी ॥
हा कधी बिघडत नाही, बेचव होत नाही; पुष्कळांनी मनसोक्त प्यायला तरी संपत नाही; जडपणा घालवतो, गोडी वाढवतो आणि तृप्ती देतो. खरोखर सुभाषिताचा रस इतर सर्व रसांहून श्रेष्ठ आहे.