बुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेश्च कुतो बलम् । वने सिंहो मदोन्मत्तः शशकेन निपातितः ॥
ज्याच्याकडे बुद्धी, त्याच्याकडेच बळ; बुद्धिहीनाकडे बळ कोठून? रानात बळाच्या मदाने धुंद झालेल्या सिंहाला एका लहानशा सशाने मारले: त्याने सिंहाला विहिरीतले स्वतःचेच प्रतिबिंब दाखवले, आणि सिंहाने त्यावर उडी घेतली.